आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:कापडण्यात रात्रभर विजेचा लपंडाव; ग्रामस्थ हैराण

कापडणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे कापडणेसह परिसरात रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वीज कंपनीने गलथान कारभारात सुधारणा केली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावातील पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग व्यावसायिक, इलेक्ट्रिक व्यावसायिक, दवाखान्यांना फटका बसतो आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेत शिवारातील काम सुरू आहे. मजूर व शेतकरी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी घरी येतात पण रात्री घरी आल्यावर वीजपुरवठा खंडित झालेला असतो. काही वेळा रात्रभर विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे झोपमोड होते. वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण स्पष्ट करावे. तसेच वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता द्यावी, अन्यथा वीज बिल भरण्यावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी, लक्ष्मण माळी, आकाश माळी, विलास बडगुजर, महेश बडगुजर, निखिल पाटील, विश्वास माळी, गोपीचंद माळी, संजय माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भील, राजेंद्र माळी, रमेश माळी, शरद माळी, ज्ञानेश्वर माळी, चुडामण माळी आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...