आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:दाखल गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष द्या; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची सूचना

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा तपास पोलिस दलाने प्राधान्याने करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी एम. एम. बागूल आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, पोलिस तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांची माहिती समाजकल्याण विभागाकडे द्यावी.

न्यायालयात दाखल गुन्ह्यांपैकी शाबित गुन्ह्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि पोलिस दलाने उपाययोजना कराव्या. खून, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये विशेष लक्ष द्यावे. काही गुन्ह्यांमध्ये जातीचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी समाजकल्याण विभाग, पोलिस दलाने उपविभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. त्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा. असेही ते म्हणाले. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पाटील यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त सादर केले. बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...