आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तीभाव:संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पालखी, टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात स्मारकावर आकर्षक रोषणाई फुलांची सजावट

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजनिमित्त रविवारी शहरात विविध कार्यक्रम झाले. त्यानिमित्त संत तुकाराम महाराज व संत जगनाडे महाराज यांचे स्मारक फुले व रोषणाईने सजवण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी काढण्यात आली.

संत तुकाराम महाराज बीजनिमित्त महापालिकेजवळ असलेले स्मारक सजवण्यात आले होते. या ठिकाणी दुपारी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी स्थायी समितीचे माजी सभापती युवराज पाटील, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी कमलाकर पाटील, भालचंद्र मोरे, ज्ञानेश्वर पाटील, शरद बिरारी, रमेश पाटील, नाना कदम, अर्जुन पाटील, प्रकाश भदाणे, दयाराम पाटील, राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील, अॅड. सुनील ठाणगे, सुधीर मोरे, संदीप पाटोळे, भूषण बागूल आदी सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी पारोळारोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी काढण्यात आली. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, हिलाल माळी, रणजित भोसले, प्राचार्य व्ही. के. भदाणे, संदीप पाटील, लहू पाटील, सुलभा कुवर, प्रा. उषा साळुंखे, प्राचार्य पूजा भामरे, वनराज पाटील, सुभाष मोरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. पारोळारोड मार्गे मिरवणूक गुरू-शिष्य स्मारकाजवळ आली. या वेळी संत तुकाराम महाराज व संत जगनाडे महाराज यांच्या स्मारकाचे पूजन व आरती झाली. तसेच त्यांच्या नावाचा जयघोष झाला.

बातम्या आणखी आहेत...