आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभवरकडून खर्डी नदीमार्गे तळोद्याकडे दुचाकीवर येताना शनिवारी दुपारी वादळामुळे झाड उन्मळून त्याखाली दाबला गेल्याने गंभीर जखमी झालेल्या कळमसरे मोहिदा येथील रवींद्र गुलाब ठाकरे (वय ४०) तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारची ही तळोदा परिसरातील दुसरी घटना आहे. शनिवारी तळोद्यासह परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे शेत शिवारात व रस्त्यालगत झाडे उन्मळून पडली. रवींद्र ठाकरे हा तरुण कामे आटाेपून दुचाकीवरून जात असताना अचानक त्याच्या दुचाकीवर वादळामुळे झाड कोसळले. या घटनेत तो झाडाखाली अडकून पडला होता.
दरम्यान झाड कोसळल्याच्या आवाजाने परिसरात घबराट पसरली. रस्त्यावर जाणारे प्रवासी व जवळच असलेले धाणकावाडा येथील नागरिकांनी झाडाखाली सापडलेल्या ठाकरे यास झाडाखाली दबलेल्या अवस्थेत दुचाकीवरून बाजूला काढले व त्यास रुग्णवाहिकेद्वारे तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले होते; परंतु उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दुचाकीस्वार ठाकरेचा मृत्यू झाल्याचे कळताच तहसीलदार गिरीश वाखारे व तलाठी बळीराम चाटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मोहिदा तलाठ्यास ठाकरे कुटुंबीयांची भेट घेण्याचे आदेश दिले. शासकीय नियमानुसार कुटुंबाला मदत दिली जाईल,अशी माहिती तहसीलदारांनी दिली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.