आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव ‎ उपक्रम:पटेल ग्रीन आर्मी सव्वा लाखावर रोप‎ करणार तयार; मोफत वाटप करणार‎

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ येथील भूपेशभाई पटेल ग्रीन आर्मी व‎ मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सव्वा‎ लाख रोप तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पप्पाजी रोपवाटिका सुरू‎ करण्यात आली आहे. या रोपवाटिकेच्या ‎ ‎ कामाला आमदार काशिराम पावरा यांच्या‎ हस्ते प्रारंभ झाला.‎ शहरातील रामसिंग नगर परिसरातील ‎आमदार अमरीश पटेल यांच्या जनक‎ व्हिला निवासस्थानाजवळील त्यांच्या‎ शेतात पप्पाजी रोपवाटिकेच्या अभिनव ‎ उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

या वेळी‎ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील,‎ सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी एस. के.‎ गवळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष‎ भूपेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त २५‎ ऑगस्टला ११० किलो विविध प्रजातीच्या‎ बियाण्यांपासून सव्वा लाख रोपे तयार‎ करण्याचा संकल्प करण्यात आला होता.‎

त्यानुसार ही रोपवाटिका तयार करण्याचे‎ काम सुरू करण्यात आले आहे.‎ रोपवाटिकेत तयार होणारी रोपे अजनाड‎ येेथील नागेश्वर महादेव मंदिरात वृक्ष प्रसाद‎ म्हणून भक्तगणांना वाटप करण्यात येणार‎ आहे. तसेच काही रोपे तालुक्यातील‎ गावांमध्ये व शिरपूर शहरातील नागरिकांना‎ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ रोपवाटिकेमध्ये अमलतास, अंजन,‎ आवळा, बेल, चिंच, ग्लिरीसिडीया,‎ काशीद, पापडी, महारुख, रेंट्री, शिवण,‎ करंज, वड, पिंपळ, सीताफळ, सिसू आदी‎ रोपे तयार करण्यात येणार आहे. पप्पाजी‎ रोपवाटिकेचे काम आमदार अमरीश पटेल‎ व माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या‎ प्रेरणेने सुरू करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...