आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासगण समिती आणि धुळे जिल्हा रुग्णालयात येणारी रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र दिनी निवेदन देण्यात आले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेवून त्यांना याबाबतचे निवेदन दिले.
हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्ण, डॉक्टर, इतर कर्मचारी, प्रशासन, रुग्णालयाच्या कारभारावर देखरेखीसाठी अभ्यागत समिती गठीत आहे. ही समिती २०१४ पासून असून त्यात काहीच बदल नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार २०१९ साली अस्तित्वात आले आहे. त्यानुसार यात बदल होणे आवश्यक होते. परंतु आज पावेतो त्यात काहीच बद्दल नाही.
यावरून जिल्हा रुग्णालय असो वा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यागत समिती तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती नव्याने गठीत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख सतीश महाले, माजी सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, शहर संघटक संजय वाल्हे, संघटक राजेश पटवारी, समन्वयक गुलाब माळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.