आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकल्याचे रुग्ण पूर्वीच्या तुलनेत वाढले आहेत. त्यामुळे खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते आहे. जिल्ह्यात अद्याप एन ३ एन २ एन्फ्लूएंझा व्हायरसच्या एकही रुग्ण आढळला नाही. पण नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क लावण्यासह गर्दीत जाणे टाळावे. तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे, लहान मुले, वृद्ध व गरोदर मातांची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
त्यात सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला, उलटीचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश घरात ही लक्षणे असणारे रुग्ण आहे. जिल्ह्यातही तशीच स्थिती आहे. अनेक रुग्णांना खोकला एक ते दोन आठवड्यापर्यंत राहतो. दीर्घकाळ सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, शरीरात वेदना होणे, थंडी वाजून येणे, थकवा जाणवणे, अतिसार, उलट्या आणि धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रुग्ण संख्या जास्त
वातावरण बदलाच्या दिवसांत दरवर्षी सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढतात. पण यावर्षी या रुग्णांची संख्या जास्त आहे. एच ३ एन २ विषाणू कोविड इतका अपायकारक नाही. चार ते पाच दिवस ताप आणि सलग पंधरा दिवस खोकला ही लक्षणे असल्यास औषधोपचार करावे. हवेद्वारे हा विषाणू पसरत नसला तरी शिंकेतून त्याचा प्रसार होतो. त्यामुळे मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. तसेच वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. नंदकिशोर पिंपळीसकर, फिजिशिअन, धुळे
लक्षण जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष नको
एच ३ एन २ विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण जिल्ह्यात अद्याप आढळलेला नाही. पण नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. हात स्वच्छ धुवावेत. तसेच लक्षणे जाणवल्यास जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करावी. - डॉ.संताष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.