आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा सहभाग:पवित्र सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्राचा दर्जा नकोच ; तीन ठिकाणी धरणे आंदोलन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड राज्यातील मधुबन येथील जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात तीन ठिकाणी सकल जैन समाजातर्फे सकाळी एका तास धरणे आंदोलन करण्यात आले. आंदाेलनात समाजातील महिला लाल साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या. यापूर्वीही या निर्णयाच्या विराेधात शहरातून मूकमाेर्चा काढण्यात आला होता.

जैन धर्मातील पवित्र स्थान म्हणून झारखंड राज्यातील मधुबन येथील महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी आहे. या क्षेत्राला शासनाने पर्यटन क्षेत्र म्हणून घाेषित केले अाहे. हा निर्णय चुकीचा आहे. या क्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्याने या ठिकाणी गैरप्रकार वाढतील. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, यासाठी समाजातर्फे राष्ट्रपती, पंतप्रधान व झारखंड सरकारला निवेदन पाठवण्यात आले होते. पण अद्यापही याविषयी निर्णय झाला नसल्याने रविवारी पुन्हा धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील गल्ली क्रमांक दाेनमधील जैन स्थानकासमाेर, शीतलनाथ जैन मंदिर अाणि सराफ बाजारातील चंद्रप्रभू दिगंबर मंदिरजवळ तीन ठिकाणी धरणे आंदाेलन करण्यात आले.

आंदोलनामुळे लालबाग चाैकापासून पुढे जैन स्थानकापर्यंत रस्ता बंद करण्यात आला होता. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आंदाेलनात जैन समाजातील व्यावसायिकांसह युवक, युवती, महिला सहभागी झाले हाेते. आंदाेलनात सहभागी पुरुषांनी पांढरा झब्बा व पायजमा तर महिलांनी लाल रंगाची साडी परिधान केली हाेती. ड्रेस काेडमुळे आंदाेलनाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आंदाेलन झाले.

बातम्या आणखी आहेत...