आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट:अवकाळी पावसाने झालेल्या‎ नुकसानीची त्वरित भरपाई द्या‎

शिंदखेडा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यात विविध‎ ठिकाणी शनिवारी रात्री अवकाळी पावसासह‎ गारपीट झाली. त्यामुळे गहू, मका, हरभरा,‎ ज्वारी, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले.‎ गुरांसाठी साठवलेला चाराही ओला झाला.‎ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ‎,‎ प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून‎ शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी‎ मागणी करण्यात आली आहे. याविषयी मंडळ‎ अधिकारी नथू माळी यांना निवेदन देण्यात‎ आले.‎

या वेळी माजी नगरसेवक सूरज देसले,‎ महेश गुरव, योगेश सोनवणे, अक्षय वाणी,‎ तुषार पाटील, सुमीत गिरासे, नितीन गुरव,‎ सचिन पाटील, विकास राजपूत, दर्शन पाटील,‎ चेतन गिरासे, अंकुश शिंदे, समाधान मराठे‎ आदी उपस्थित होते. गहू, हरभरा, मका आदी‎ पिके काढणीवर आलेली असताना अवकाळी‎ पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला‎ आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी पुढील‎ आठवड्यात गहू काढणीचे नियोजन केले होते.‎ पण पाऊस व वादळामुळे हाता तोंडाशी‎ आलेला घास निसटला आहे. त्यामुळे‎ प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी‎ निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...