आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर:देवपुरात आढळला मोर; मोराला सोबत घेत पोलिस ठाणे गाठले

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील मांस व मासळी विक्रीच्या बाजारात दीप मवस्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी होती. त्या वेळी या भागात सायंकाळी मोर आढळला. याविषयीची माहिती वन्यजीव प्रेमींना मिळाल्यावर त्यांनी मोराला सोबत घेत पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे मोर देण्यात आला.

देवपुरातील मांस व मच्छी बाजारात गुरुवारी सायंकाळी गर्दी झाली होती. कारण या ठिकाणी एक मोर आढळून आला. या विषयीची माहिती वन्यजीवप्रेमी हर्षवर्धन राजपूत याला मिळाली. त्याने घटनास्थळी येत मोर ताब्यात घेतला. तसेच देवपूर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांच्या मदतीने वन विभागाला कळवले. त्यानंतर रात्री आठ वाजता वनरक्षक भरत मोरे, सतीश चांदणे दाखल झाले.

तर सत्य समोर : जप्त मोर ही मादी असून, दोन वर्षोची आहे. शहराच्या हा मोर आला कसा ? हा प्रश्न उपस्थित होतो. दीप अमावास्येशी त्याचा संबंध जोडला जातो आहे. त्यामुळे पोलिस, वन विभागानेही लक्ष देणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...