आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:छावडी शिवारात पादचारी झाला ठार; भरधाव वेगातील पिकअपने धडक

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील छावडी शिवारात भरधाव वेगातील पिकअपने धडक दिल्यामुळे पादचारी ठार झाला. या प्रकरणी निजामपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छावडी येथील उमेश भाईदास मोरे (वय २७) हा पायी जात असताना त्यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने (एमएच-१८-बीजी-३७९७) त्याला धडक दिली. या अपघातात उमेश मोरे हा गंभीर जखमी झाल्याने ठार झाला. अपघातानंतर चालकाने पळ काढला.

याप्रकरणी संदीप रामदास मोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चालकावर निजामपूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...