आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अभियंता वर्षा घुगरींच्या विरोधात लेखणी बंद

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थगिती दिली. त्यानंतर त्या कामावर रुजू झाल्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन केले. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले व निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले.

कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या कार्यप्रणाली विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांची बदली झाली. मॅटने बदलीला स्थगिती दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी बांधकाम विभागात रुजू झाल्या.

त्याविरोधात बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन केले. कार्यकारी अभियंता घुगरी यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे, तसे झाले नाही तर उद्या मंगळवारपासून सविनय असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...