आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकुवा:शाश्वत विकासासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे यावे; हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचे मत

अक्कलकुवा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण नाशिक येथे झाले. त्या वेळी ते शाश्वत ग्रामविकास याविषयावर बोलत होते. उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत पाटील उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले की, कोणतेही काम करताना आक्रमकता लागते. मात्र आक्रमकता ही तुटेपर्यंत ताणायची नसते. विकासासाठी अभ्यासासह समन्वयाची आवश्यकता आहे.

आज आपल्याकडे जे पद आहे ते कदाचित उद्या नसेल त्यामुळे जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करा असेही ते म्हणाले. शिबिरात सदस्यांना कामकाजाची माहिती देण्यात आली. नरेगा, तालुका विकास आराखडा, पर्यावरण व जलस्रोत संवर्धनातील अडचणींवर मार्गदर्शन केले. यशदाचे प्रवीण प्रशिक्षक अशोक पाटील, नीता पाटील, भारत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशदाच्या सत्र संचालक डॉ. अनिता महिरास, अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती मनीषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, जि.प. सदस्य प्रताप वसावे, पं.स. सदस्य नानसिंग वळवी, सुधीर पाडवी, जेका पाडवी, किशोर पाडवी, भरत पाडवी, लक्ष्मी पाडवी, जयवंती वसावे, निर्मला वसावे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...