आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Perform Compartment Bunding In Each Village To Increase Groundwater Level; Deputy Director Of Adarsh Gaon Samiti Bhalerao Conducted An Inspection In Karle Village |marathi News

आढावा:भूजल पातळी वाढण्यासाठी प्रत्येक गावात कंपार्टमेंट बंडिंगची कामे करा; आदर्श गाव समितीचे उपसंचालक भालेराव यांनी कर्ले गावात केली पाहणी

दोंडाईचा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाव शिवारातील सर्व क्षेत्रात कंपार्टमेंट बंडिंगची कामे केल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंपार्टमेंट बंडिंगची कामे शेतात करावी, अशी सूचना आदर्श गाव समितीचे उपसंचालक सुरेश भालेराव यांनी केली.

आदर्श गाव योजनेत निवड झालेल्या शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावाला उपसंचालक सुरेश भालेराव यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी तंत्र अधिकारी गणपत धोंगडे, मंडळ कृषी अधिकारी नवनाथ साबळे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बाविस्कर, कृषी सहायक कपिल चौधरी, सरपंच साहेबराव पवार, उपसरपंच गोकुळ बेडसे, पोलिस पाटील प्रफुल्ल पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य पंडित पाटील, विठ्ठल पाटील, ग्राम कार्यकर्ता परमेश्वर पाटील, संस्थेचे अध्यक्ष अतुल भारती आदी उपस्थित होते. भालेराव यांच्या पथकाने कामाची पाहणी करून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...