आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द बाळगा ; माळी समाजाच्या पहिल्या नायब तहसीलदार सोनवणे यांचे मत

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द बाळगली पाहिजे. जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळते, असे मत नवनियुक्त नायब तहसीलदार बेला सोनवणे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील माळी समाजातील वरवाडे येथील बेला सोनवणे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. त्यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट व वरवाडे ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. आमदार काशिराम पावरा अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, अॅड.सुरेश सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिगंबर माळी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, माजी नगरसेवक पंढरीनाथ सोमा माळी, शिरपूर विकास सोसायटीचे संचालक उत्तमराव माळी, नगरसेविका चंद्रकला संतोष माळी, नगरसेवक दीपक माळी, मांडळचे भटू माळी आदी उपस्थित हाेते. बेला सोनवणे म्हणाल्या की, या पदावर पोहोचली याचे श्रेय फक्त आई-वडिलांना आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी निराश न होता करावी. जिद्द, चिकाटी, परिश्रम घेतल्यास यश संपादन करू शकताे असेही त्या म्हणाल्या. आमदार काशिराम पावरा यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी, वसंत देवरे, छगन माळी, माजी नगरसेवक काशिनाथ सोमा माळी, दगा माळी, राजेश सोनवणे, नाना माळी, आर.आर. माळी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, अखिल भारतीय माळी महासंघाचे सदस्य जी.व्ही. पाटील आदी उपस्थित होते. बापू मास्तर यांनी सूत्रसंचालन केले. युवराज माळी यांनी आभार मानले. बेला सोनवणे या शांतिलाल डिंगबर माळी व माजी नगरसेविका सुंनदा शांतिलाल माळी यांच्या कन्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...