आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अंबिकानगरातून दहशत निर्माण करत मिरवणूक काढणाऱ्या ५० जणांवर मध्यरात्री चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी मुख्य संशयित सत्तार मेंटलचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द व्हावा यासाठी पोलिस न्यायालयात विनंती अर्ज देणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
खुनाच्या एका गुन्ह्यात सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल याच्या विरोधात चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली हाेती.
जामीन मंजूर झाल्यानंतर सत्तार मासूम पिंजारी याच्यासह समीर मन्यार, अमिर रियाज शेख उर्फ अमिर माया, गुलाब रसुल शब्बीर अन्सारी, शेख सोहेल उर्फ सिंधी, शोएब खान गुलाब खान, मोहंमद फारुख खान उर्फ भिल्ल, मोहंमद शाहीद मोहंमद रियाज अहमद, अख्तर नईम कुरेशी यांच्या सुमारे ५० जणांनी वाजत गाजत अंबिकानगरातून पांझरा नदीपर्यंत मोटारसायकलवर मिरवणूक काढली होती. दहशत निर्माण करत या प्रकारातून साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता.
याबाबत बुधवारी रात्री ५० जणांविरुद्ध चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय सत्तार व इतर नऊ जणांना अटक करण्यात आली. सत्तार मेंटलमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते. तसेच खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदारांवरही दबाव संभवतो. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करावा, अशी विनंती पोलिस न्यायालयाला करणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पोलिस आता शोधणार चाळीस संशयितांना
सशंयितांना गुरुवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य ४० अनोळखी संशयितांचा शोध घेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.