आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वानुमते मंजुरी:सामोडे ग्रामसभेत मांडला विकास कामांचा आराखडा

पिंपळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामोडे येथे झालेल्या ग्रामसभेत शिवाजीराव दहिते यांनी गावाचा विकास कामांचा आराखडा मांडला. यावेळी प्रतिनिधींनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या.या वेळी येथील जुनागाव येथील समाज मंदिराच्या कामाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शिवाजीराव दहिते यांनी २० लाखांचा निधी मंजूर केला असून, लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

यात येथील जुनागाव येथे एक समाज मंदिर, तसेच दत्तनगर येथील दत्त मंदिराची नवीन उभारणी तसेच गावातील घोडमाळसह दत्तनगर, विठ्ठलनगर (नवागाव) व श्रीराम नगर (जुनागाव) ग्रामस्थांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा, गावातील सुरक्षा भिंत तसेच सार्वजनिक रस्ते, भूमिगत गटारी, शौचालय आधी कामांचा आराखडा तयार करण्यात आला. या वेळी सरपंच आरती भारुडे, उपसरपंच सचिन शिंदे, जि.प. सदस्य दीपक भारुडे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब घरटे, साक्री पं.स. अभियंता संदीप शिदे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम दहिते, ग्रामपंचायत सदस्य सागर पानपाटील, माजी उपसरपंच मुकुंद घरटे, ग्रामसेवक एस.डी. लाड, शंकर घरटे, अभय शिंदे, नंदलाल घरटे, अरुण शिंदे, धनंजय घरटे, अरविंद घरटे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...