आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण कक्ष सुरू‎:संप काळातही अखंडित‎ विजेसाठी केले नियोजन‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या भांडूप‎ परिमंडळ कार्यक्षेत्रात अदानी ‎इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज ‎वितरणासाठी विद्युत नियामक ‎आयोगाकडे मागितलेल्या‎ परवान्याच्या विरोधात वीज‎ कंपनीतील कर्मचारी मध्यरात्रीपासून ‎ ‎ तीन दिवसांच्या संपावर जाणार‎ आहे. संप काळात ग्राहकांच्या‎ समस्या सोडवण्यासाठी वीज‎ कंपनीची हेल्पलाइन सुरू असेल.‎ संपामुळे नागरिकांची गैरसोय‎ होऊ नये यासाठी नियंत्रण कक्ष सुरू‎ करण्यात आला आहे. हा कक्ष २४‎ तास कार्यरत असेल. कंपनीने ठरवून‎ दिलेली कामे न करणाऱ्या‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या‎ विरोधात कारवाई होणार आहे.

‎रजेवर असलेल्या अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू‎ होण्याचे आदेश देण्यात आले आहे.‎ संपकाळात वीजपुरवठा अखंडित‎ ठेवण्यासाठी महावितरण कंपनी‎ एजन्सीचे कामगार, कंत्राटी‎ कामगार, सेवानिवृत्त अभियंता व‎ कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम‎ विभागाची मदत घेणार आहे.‎येथे साधा संपर्क‎ वीज पुरवठा खंडित झाल्यास‎ ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक‎ १८००-२१२-३४३५,‎ १८००-२३३-३४३५, १९१२ किवा‎ १९१२० या क्रमांकावर संपर्क साधावा‎ असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...