आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:अक्कलपाडा योजनेतून मार्चअखेर‎ पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तापी पाणीपुरवठा‎ योजनेच्या सुकवद पंपिंग‎ स्टेशनमध्ये नवीन ३ नवीन पंप‎ फेब्रुवारी अखेर बसवण्यात येणार‎ आहे. पंप बसवल्यावर मनपाचे‎ वीजबिलावर खर्च होणारे एक‎ कोटी रुपये वर्षाला वाचतील.‎ मार्च महिन्यापर्यंत नवीन पंप‎ कार्यान्वित होतील.‎ तापी योजनेच्या सुकवद पंपिंग‎ स्टेशनमधील पंप जुने झाल्याने‎ वारंवार नादुरुस्त होतात.

या‎ ठिकाणी ४ पंप असून एक पंप‎ राखीव आहे. पंप जुने झाल्याने ते‎ बदलले जाणार आहे. त्यानुसार‎ किर्लाेस्कर कंपनीत पंप केले जात‎ आहे. . सुकवदला सद्य:स्थितीत ४‎ पंपाद्वारे तासाला २० लाख लिटर‎ पाणी उपसले जाते. हे काम नवीन‎ ३ पंपाद्वारे होईल. त्यामुळे एकाचे‎ पंपाचे वीजबिल कमी होईल.‎

सुकवद पंपिंग स्टेशनचे महिन्याला‎ ६० लाख रुपये वीज बिल येते.‎ नवीन पंप बसवल्यावर हे बिल ४५‎ लाखावर येईल. त्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वीजबिलाचे १ कोटी रुपये‎ वर्षभरात वाचतील. नवीन पंप‎ ४५० अश्वशक्तीचे असतील.‎ त्यांच्या पाइपाचा व्यास अधिक‎ असल्याने पाणी उपसण्याची‎ क्षमता जास्त आहे. त्यामुळे‎ अधिक पाणी कमी वेळेत‎ जलशुद्धीकरण केंद्रात येईल.‎ नवीन पंप फेब्रुवारी अखेरपर्यंत‎ बसवणे अपेक्षित आहे. त्यानंतर‎ मार्च महिन्यापासून या पंपाद्वारे‎ पाणीपुरवठा होईल, अशी माहिती‎ मनपाने दिली आहे.‎

असा होईल फायदा‎
सुकवद पंपिंग स्टेशनमध्ये एका‎ पंपाद्वारे तासाला ४ लाख ५० हजार‎ लिटर पाणी उपसले जाते. नवीन‎ पंपाद्वारेएका तासाला ७ लाख‎ लिटर उपासा होईल. सद्य:स्थितीत‎ ४ पंप मिळून तासाला २० लाख‎ लिटर पाणी उपसतात. नवीन पंप‎ २१ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी‎ उपसतील.‎

बातम्या आणखी आहेत...