आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रस्त्याच्या दुतर्फा लावणार रोप; झाडांना पाणी घालण्यासाठी टँकर केला उपलब्ध

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित भूपेशभाई ग्रीन आर्मीतर्फे कृतीबेन भूपेशभाई पटेल यांचा हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महिलांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. तसेच प्रदूषणमुक्त शिरपूरचा संकल्प केला.

दरवर्षाप्रमाणे यंदाही भूपेशभाई ग्रीन आर्मीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. आमदार अमरीशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्री अमरीशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल, उद्योगपती चिंतन अमरीश पटेल, द्वेता भूपेश पटेल यांचा मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येते आहे. या वेळी कृतीबेन भूपेश पटेल, कक्कूबेन पटेल, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, माजी पंचायत समिती सदस्य रंजना गुजर, सीमा रंधे (संचालिका धुळे-नंदूरबार जिल्हा बँक), ज्योती सोनवणे (जायंट्स वेल्फेअर युनिट डायरेक्टर), साधना पोतदार, कल्पना कोळी, अरुणा बडगुजर, शालिनी सोनवणे, निर्मला राजपूत, ज्योती इंदवे, कविता बाविस्कर, स्मिता नाईक, भाग्यश्री पवार, रोजी देशमुख यांनी वृक्षारोपण केले.

भूपेशभाई ग्रीन आर्मीतर्फे यावर्षी शिरपूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा तसेच शहरातील मोकळ्या जागेत लिंब तसेच पेंटाफार्मची रोप लावण्यात येणार आहे. तसेच अरुणावती नदीच्या दुतर्फा बांबू लागवडीचे नियोजन आमदार अमरीश पटेल, भूपेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिरपूर शहरात भूपेशभाई ग्रीन आर्मी तसेच विविध संस्था, विद्यार्थी, नागरिक यांनी लावलेल्या वृक्षांना पाणी देण्यासाठी एक वॉटर टँकर उपलब्ध करून दिला आहे. या टँकरद्वारे रोज विविध भागातील वृक्षांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...