आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:रांझणीत विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड

तळोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालयात वन महोत्सव कार्यक्रम २०२२ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्यात आवळा, सीताफळ, जांभूळ, कैठ, चिंच आदी विविध प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहेे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच घटक कृषी तंत्र विद्यालय, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, नंदुरबार जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्रवीणकुमार जैन, रांझणीचे माजी उपसरपंच कांतिलाल भापकर, ग्रामविकास अधिकारी मुकेश कापुरे, कृषी सहायक पी.आर. दळवी, चंद्रप्रकाश पवार, रांझणी विकासाेचे उपाध्यक्ष योगेश भोसले, प्रगतिशील शेतकरी राहुल पाडवी, किशोर राजपूत, कांतिलाल जांभोरे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रवीण वसावे, प्रा.शरद साठे, भिकन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दीपक मराठे, जितेंद्र वानखेडे, भरत ठाकरे, नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन गांगुर्डे, आदित्य आंधळे, ओंकार भोईर, जितेंद्रकुमार यादव, गणेश बारेला, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...