आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवावी; पालक सचिव रस्ताेगी यांची मनपाला सूचना

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेने वृक्ष संवर्धन अभियानासह प्लास्टिक बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी. कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते.

विकासचंद्र रस्तोगी म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ वेळेत मिळेल यासाठी प्रयत्न करावे. रब्बी हंगामात खत व बियाण्यांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी विकास कामांचा आढावा सादर केला. नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी जिल्हा वार्षिक योजना, आमदार, खासदार निधी व डोंगरी विकास तर अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहरातील कामांची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...