आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ प्लास्टिक संकलन अभियान:शिरपूरमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम

शिरपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, शिरपूर वरवाडे नगर परिषद व पुण्यातील सागर मित्र संस्थेतर्फे स्वच्छ प्लास्टिक संकलन अभियान सुरू करण्यात आले. माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या हस्ते अभियानाला प्रारंभ झाला.

शहरातील आर. सी. पटेल मेन बिल्डिंगच्या प्रांगणात कार्यक्रम झाला. आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे सचिव प्रभाकर चव्हाण, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा आदी उपस्थित होते. या वेळी भूपेश पटेल यांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा असे आवाहन केले. डॉ. सुप्रिया पंतवैद्य यांनी प्लास्टिक कचऱ्याबाबत तसेच प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. पौर्णिमा पाठक यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबवला जातो आहे.

बातम्या आणखी आहेत...