आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करणार न्यायालयात उभे:शहरात थर्टी फर्स्टला पोलिसांनी 14 मद्यपींची उतरवली झिंग

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षअखेर अर्थात थर्टी फर्स्टला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विविध भागात मध्यरात्रीपर्यंत पोलिस तैनात होते. वाहन चालकांना उद्या सोमवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. काेरोनाचे निर्बंध नसल्याने यंदा थर्टी फर्स्टचा उत्साह मोठा होता. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी अनेक जण मद्यपान करतात. मद्यपान केल्यावर काही जण वाहन चालवतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी मद्यपींवर कारवाई केली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलिस रात्री आठ ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत विविध चौकात तळ ठोकून होते. बारापत्थर चौक, दसेरा मैदान, नगावबारी, पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी दोन कारचालक व १२ मोटारसायकल चालक अशा १४ जणांची वाहने जप्त केली आहे. सहायक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी स्वत: रस्त्यावर होते.

बातम्या आणखी आहेत...