आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विखुर्लेतील तणाव पोलिसांमुळे निवळला ;पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले शिवारात एका मूर्तीवरील शेंदूराचा लेप निघाल्याचे दिसून आले. हा प्रकार शनिवारी समोर आला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विखुर्ले गावात मंदीर आहे. या ठिकाणी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे भाविक आल्यावर त्यांना मूर्तीवरील शेंदूराचा लेप निघाल्याचे दिसून आले. हा प्रकार समोर येताच नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिस ठाण्याचे अधिकारी संतोष लोले, उपनिरीक्षक सचिन गायकवाड व पथक दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. तसेच दोषींचा शोध घेत कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे तणाव निवळला. घटनेबद्दल कृष्णा दादाभाई भील या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...