आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्याचा तपास:पोलिस 3 हजारांची लाच घेताना जाळ्यात ; प्रतिबंधक विभागाची कारवाई

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल कौटंुबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात संशयितांना अटक करण्यासाठी ३ हजारांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. दीपक ठाकूर असे या पोलिसाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती व सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास हेडकॉन्स्टेबल दीपक देविदास ठाकूर (वय ४८) यांच्याकडे होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तक्रारदार महिला भावाकडे राहते. त्यांचा भाऊ या गुन्ह्याच्या पाठपुराव्या विषयी दीपक ठाकूर यांना भेटण्यासाठी गेला होता. संशयितांना कधी अटक होईल, अशी विचारणा त्याने दीपक ठाकूर यांना केली होती. त्यासाठी ठाकूर यांनी ५ हजारांची मागणी केली. याबाबत महिलेच्या भावाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पथकाने मंगळवारी पडताळणी केली. त्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावण्यात आला. तसेच तडजोडीअंती ३ हजार देण्याचे ठरले. लाच घेताना दीपक ठाकूर यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...