आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील क्रांती नगरातील राहुल भोई या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. महिन्याभरात दोन तरुणांची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी अंकुश लावण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार अमरीश पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. आमदार अमरीश पटेल यांनी सांगितले की, शिरपूर शहराची शांततेसाठी ओळख आहे.
पण काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्याने शहराची शांतता धोक्यात आली आहे. क्रांतीनगर परिसरात दहशत पसरवणाऱ्यांसह शहरातील इतर भागात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज आहे. याविषयी शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्याशी चर्चा करणार आहे.
राहुल भोई हत्या प्रकरणातील एकही आरोपी मोकाट सुटता कामा नये. पोलिसांनी रात्री दहा वाजेनंतर गस्त वाढवण्याची गरज आहे. तसेच खून प्रकरणी सर्व आरोपींना अटक करावी. शहरातील मुख्य चौकांमध्ये तरुणांचे टोळके उभे राहून गैरकृत्य करतात. त्यांना चाप लावावा. शहरातील कॅफे संस्कृती बंद करावी. नागरिकांनीही सहकार्य करावे असेही आमदार पटेल यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.