आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका:‘हिरे’तील बंदोबस्त पोलिसांनी काढला,‘मसुब’वर जबाबदारी; अनेकदा वाद होत असल्याने पोलिसांना हटवणे धोकेदायक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरे रुग्णालयात डॉक्टरांवर झालेले हल्ले, रुग्णाच्या मृत्यूनंतर होणारी मोडतोड अन् वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या गुन्हेगारांचा धिंगाणा या भूतकाळातील घटनांचा पोलिसांना विसर पडला असावा. कारण पोलिसांनी अपूर्ण मनुष्यबळाचे कारण सांगून हिरे रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. त्यामुळेच रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आता ‘मसुब’ अर्थात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या खांद्यावर आहे.

चक्करबर्डी परिसरात हिरे रुग्णालयात अपघात विभागासमोर पोलिस चौकी आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी चार पोलिस कर्मचारी कार्यरत होते. दरम्यानच्या काळात पोलिसांना मदतीसाठी मसुब अर्थात महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा पुरवण्यात आली. सुरक्षा बलाचे ५८ जवान या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तैनात आहे.

एकावेळी १६ जवान कार्यरत असतात. पोलिस व जवानांमुळेच डॉक्टरांवरील हल्ले, रुग्णांच्या नातलगांचा आक्रमकपणा व गुन्हेगारांचा धिंगाणाही नियंत्रणात आला होता. गेल्या पाच वर्षांपासून पोलिस व जवान सोबत कार्यरत होते. पण आता पोलिस प्रशासनाने या ठिकाणी दिवसा बंदोबस्तावर असलेले १२ कर्मचारी काढून घेतले आहे. केवळ पोलिस ठाण्यात घटना कळवण्यासाठी एक कर्मचारी रुग्णालयात असेल. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा पूर्णपणे महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या खांद्यावर आहे.

सुरक्षा बलाची वेळ : महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सकाळी ७ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत असतात.

बातम्या आणखी आहेत...