आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधांचा अभाव:मनपा शाळेच्या आवारात तळे; विद्यार्थी, पालकांचे मनपामध्ये ठिय्या आंदोलन

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मनपा शाळा क्रमांक वीसच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे शुक्रवारी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मनपात आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.मनपाच्या शाळा क्रमांक २० च्या आवराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. विद्यार्थी शुक्रवारी सकाळी शाळेत आले. पण शाळेच्या प्रवेशद्वारापासून थेट वर्गापर्यंत पाणी साचले होते. शाळेसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूला गटार बांधण्यात आली आहे.

पण शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ गटारीचे काम झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे पाणी शाळेच्या मैदानात साचते. याविषयाकडे शालेय व्यवस्थापन समितीने लक्ष वेधले होते. पण उपयोग झाला नाही. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जमील शहा, उपाध्यक्ष अत्ताऊर रहेमान व मुख्याध्यापक नफीस अहमद आदींनी यांनी आंदोलन केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...