आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:महामार्गावर विद्युत पोल कोसळल्याने ३० तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित; नागरिकांची झाली गैरसोय

पिंपळनेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर, सामोडे परिसरात शनिवारी पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसला. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व घरांचे ही पत्रे उडाले. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. विद्युत खांब कोसळल्याने शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून वीजपुरवठा खंडित आहे.

शनिवारी पुन्हा दुपारी ३ वाजता वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली व उपकेंद्रासमोर सामोडे, पिंपळनेर मार्गावर असलेल्या पांडुरंग कोठावदे यांच्या गोडाऊनची पत्रे उडून विद्युत खांबवर पडली. दोन विद्युत खांब कोसळल्याने बराच वेळ महामार्गावर वाहतूक ठप्प होती. तब्बल ३० तासांहून अधिक वेळेपासून वीज खंडित आहे. परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे

बातम्या आणखी आहेत...