आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अक्कलपाडा पाणी योजनेसाठी एक्स्प्रेस फीडरवरून वीजपुरवठा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी एक्स्प्रेस फीडरमधून वीज जोडणी देण्यास वीज कंपनीने मंजुरी दिली आहे. अक्कलपाडा धरणापर्यंत वीजवाहिनी टाकणे अशक्य असल्याने ३३ केव्ही उपकेंद्रातून विशेष बाब म्हणून वीज जोडणी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

हा प्रस्ताव महावितरण कंपनीच्या महासंचालकाकडे गेला होता. त्यानंतर खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त प्रदीप कर्पे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना याेजनेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर एक्स्प्रेस फीडर मंजूर झाले.

बातम्या आणखी आहेत...