आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस प्रबोधन मेळावा:कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 15 मे पूर्वी जिल्ह्यात होणार प्रबोधन मेळावा; कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा पुढाकार, ज्ञानेश्वर भामरे यांची माहिती

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची नुकतीच मुंबई येथे बैठक झाली. या वेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यासह त्यांचे प्रबोधन करण्याचा ठराव झाला. हा मेळावा १५ मेपूर्वी जिल्ह्यात घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती कॉटन असोसिएशनचे संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी दिली.

बैठकीला कॉटन एक्स्चेंज असोसिएशनच्या २१ पैकी १४ सदस्य हजर होते. त्यात महाराष्ट्रातर्फे ज्ञानेश्वर भामरे यांचा समावेश होता. त्यांनी अध्यक्ष अतुल गणतारा यांना निवेदन दिले. असोसिएशनच्या कार्याला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण असोसिएशन फक्त जिनिंग, स्पिनिंग, व्हिविंग आणि ट्रेडिंग यांच्यासाठीच काम करते. कापूस पिकवणारा शेतकरी मुख्य केंद्रबिंदू असून, त्याच्याकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे कॉटन असोसिएशनतर्फे शेतकऱ्यांसाठी प्रबोधन मेळावा घेण्यात यावा, या मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करावे, शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर भामरे यांनी केली.

त्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यासह त्यांचे प्रबोधन करण्याचा ठराव झाला. हा मेळावा १५ मेपूर्वी जिल्ह्यात घेण्याचा निर्णय झाल्याचे कॉटन असोसिएशन इंडियाचे संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...