आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:शहाद्यातील प्रजापती ब्रह्माकुमारी; ईश्वरीय विद्यालयात वृक्षारोपण

शहादा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गणेश नगरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी विद्यादिदी, ब्रह्माकुमारी शीला दिदी, राजेंद्र जाधव, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिणी भावसार यांच्यासह ओम शांती परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

आमदार पाडवी व विद्यादिदी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून राेपे वाटप करण्यात आली. ब्रह्माकुमारी विद्यादिदी यांनी वृक्षारोपण व पर्यावरणाचे महत्त्व जाणून घेण्याचे आवाहन केले. वृक्ष लागवड केल्यानंतर परमेश्वरी रूपाप्रमाणे त्याचे संगोपन करावे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनीही मनोगताद्वारे मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...