आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागणपती, विठ्ठल रखुमाई, शिव परिवार, हनुमंत, गरुड, संत नथ्थूसिंह महाराज यांच्या नूतन मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन तावखेडा येथे ज्योतिष भास्कर डॉ. शैलेश देशपांडे यांचे आचार्यत्वात झाला. या वेळी पंडित अतुल अग्निहोत्री, योगेश बुवा, पंडित महेंद्र जोशी हे याज्ञीक पुरोहित उपस्थित होते. या कार्यक्रमास महंत संजय जोशी उपाख्य बापू महाराज सावरगाव, येवला तसेच श्री रामदेवजी महाराज, कलमसरा यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक महाराज टिल्लू, विखरणकर यांचे हस्ते हा कलशारोहनाचा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी विठ्ठल रुख्मिणी ची महती अशोक महाराज टिल्लू, विखरणकर यांनी विषद केली. विठ्ठल स्तवनाचे काही निवडक अभंगाचे गायन करून त्याचा अर्थ उलगडून सांगितला. प्रथम दिनी मूर्तींची शोभायात्रा सकाळी तावखेडा गावांतून अत्यंत उत्साहात पार पडली. पुण्याहवाचन, प्रासाद वास्तुशांती, जलयात्रा, जलाधिवास, पंचगव्य स्रान, सप्तमृतिका कलश स्नान, औषधी स्नान, मूर्ती स्नपन, प्रसाद स्नपन, धान्यादिवास, शैय्याधिवास, १०८ दीपउत्सव, मंडल देवता स्थापन, स्थापित देवता पूजन, स्थापित देवता हवन असे विविध धार्मिक संस्कारासह सकाळी शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन बलिदान, भव्य पूर्णाहुती, आरती संपन्न झाली. या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन केले होते. आपल्या उदार मन प्रगट करून खूप दिवसांपासून आर्थिक अडचणीत अडकलेल्या मंदिर निर्मितीच्या कामात भरीव आर्थिक योगदान विजय शांताराम कुळकर्णी दिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक रत्नाकर कुलकर्णी, श्रीपाद रत्नाकर कुलकर्णी, दिलीप खंडेश्वर कुलकर्णी, राजेंद्र सुधाकर कुलकर्णी, महेश पद्माकर कुलकर्णी, राजेंद्र खंडेश्वर कुलकर्णी, प्रसाद रत्नाकर कुलकर्णी, संजय रामदास कुलकर्णी व संपूर्ण कुलकर्णी परिवार यांनी विशेष सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.