आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लावण्याची तयारी ; निर्णय झाल्यास 57 शिक्षकांना लाभ

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने सहावी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू केल्यास किती आर्थिक बोजा पडेल याची माहिती शिक्षण संचालकांनी शिक्षण विभागाकडून मागवली होती. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेत ५७ पदवीधर शिक्षक असून त्यांना पदवीधर वेतनश्रेणी लागू केल्यास वर्षाकाठी ७२ लाख ५ हजार ३०० रुपयांचा खर्च वाढेल.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकेच्या शाळांमध्ये उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. ही समिती शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यामागील पार्श्वभूमी, शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमध्ये झालेले बदल, वेतनश्रेणी लागू झाल्यावर पडणारा आर्थिक बोजा याचा अभ्यास करून शासनाला अहवाल देईल. त्यानुसार शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेकडून सविस्तर माहिती मागवली आहे.

जिल्ह्यात सहावी ते आठवीसाठी जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षकांची ११२ पदे मंजूर आहे. त्यात पदवीधर वेतनश्रेणीत घेत असलेले २१ शिक्षक आहे. पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या परंतु पदवीधर वेतनश्रेणीचे वेतन घेत नसलेल्या शिक्षकांची संख्या ३२ आहे. या ३२ शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू केली तर वर्षाकाठी २१ लाख ६ हजार ८०० रुपयांचा भार तिजोरीवर पडेल. तसेच जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षकांची ४५ पदे रिक्त आहे. या पदांना वेतनश्रेणी लागू केल्यास तिजोरीवर ३३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा बोजा पडेल. एकूण ५४ लाख ८५ हजार ३०० रुपयांचा वाढीव निधीची गरज भासेल. ही माहिती शासनाला पाठवली आहे.

शहरी भागातील २५ शिक्षक : महापालिकेच्या शाळेत पदवीधर शिक्षकांची २२ पदे मंजूर आहे. त्यापैकी दोन शिक्षक पदवीधर वेतनश्रेणीनुसार वेतन घेता आहे. तसेच २० शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू नाही. त्यांना वेतनश्रेणी लागू केल्यास ७ लाख २० हजार रुपयांचा आर्थिक बोजा पडेल. शिरपूर वरवाडे नगरपालिकेअंतर्गत पदवीधर शिक्षकांची नऊ पदे मंजूर आहे. त्यापैकी चार पदे रिक्त आहे. उर्वरित पाच पदांवर शिक्षक कार्यरत आहे. त्यांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ दिल्यास तिजोरीवर ५ लाखांचा भार वाढेल.

बातम्या आणखी आहेत...