आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आयुष्यमान योजनेंतर्गत हेल्थ आयडी करा तयार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना सुरू झाली आहे. नागरिकांनी आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट अर्थात हेल्थ आयडी तयार करावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत सर्व आरोग्य सेवा डिजिटल स्वरूपात पोहाेचवण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट अर्थात हेल्थ आयडी करण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिकांनी हेल्थ आयडी करावा. हा आयडी ऑनलाइन करावा लागणार असून, त्यासाठी आधार संलग्न मोबाइल नंबर बंधनकारक आहे. हेल्थ आयडी तयार करण्यासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य मित्रांची मदत घेता येता येऊ शकते, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...