आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलोशीप:माजी विद्यार्थी गुणवंतांना‎ देणार प्रेरणा फेलोशीप‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी महाविद्यालयातील सन २००५‎ ते २००९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र‎ येत माजी विद्यार्थी प्रसाद शिवथरे, योगेश‎ साळवे आणि अविनाश वामन यांच्या‎ स्मृती निमित्त प्रेरणा फेलोशीप सुरू केली‎ आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना ही फेलोशीप‎ दिली जाणार आहे. महाविद्यालयातील‎ माजी विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत चव्हाण,‎ नीलेश यादव, स्वाती बागल-शिंदे,‎ सदानंद चिंचकर यांनी कृषी‎ महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.‎ चिंतामणी देवकर, विद्यार्थी कल्याण‎ अधिकारी प्रा. जे. एस. सूर्यवंशी,‎ सहाय्यक कुलसचिव वाय. बी. तायडे,‎ विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रा. एस. बी.‎ देसले, शारीरिक शिक्षण निदेशक प्रा. के.‎ बी. पाटील यांच्याशी फेलोशीप वर चर्चा‎ केली.

प्रसाद शिवथरे यांच्या स्मृतीनिमित्त‎ प्रथम, द्वितीय वर्षातील उत्कृष्ट एनसीसी‎ छात्रसैनिक, योगेश साळवे यांच्या स्मृती‎ निमित्त प्रथम व द्वितीय वर्षातील उत्कृष्ट‎ खेळाडूंना फेलोशीप दिली जाणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...