आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:रॅलीमुळे प्रतिबंधात्मक कारवाई ; शिरपूर पोलिसांनी काढली तरुणांची समजूत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मेहेरगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणााऱ्या अॅण्टी कास्ट बाईकर्स रॅलीसाठी निघालेल्या तरुणांना पोलिसांनी शुक्रवारी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. शहर, साक्री व शिरपूर पोलिसांनी तरुणांची समजूत काढली.

मेहेरगाव येथे पोळ्याच्या दिवशी दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर गावात तणाव निर्माण झाला. दुसरीकडे प्रशासनाने गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील ज्येष्ठ प्रयत्नशील आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक जन आंदोलनातर्फे अॅण्टी कास्ट बाईकर्स रॅली काढण्यात येणार होती. त्यासाठी सिध्दार्थ जगदेव, सचिन बागुल, मनोज नगराळे, शरद वेंदे, राकेश अहिरे, सिध्दांत बागुल, जितेंद्र अहिरे, संदीप बोरसे, मनिष दामोदर, अतुल बैसाणे, अमोल शिरसाठ, मानसी पवार, निलीमा भामरे आदी एकत्र आले होते. शहर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरूवात होणार होती. या वेळी शहर पोलिसांनी सुमारे ७० जणांना तर शिरपूर पोलिसांनी २० जणांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...