आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापडणेसह परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदे लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न घेतले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, फवारणी, निंदणी, खते रात्रंदिवस वेळोवेळी पाणी देत कांद्याचे यशस्वी पीक घेतले मात्र शेतकऱ्यांना कमीत कमी बाराशे रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित असताना फक्त पाचशे रुपये क्विंटल दर मिळत असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.
कापडणेसह नगाव, धमाणे, धनूर, लोणकुटे, सायने, नंदाणे, बोरीस, रामी, बिलाडी, कौठळ, न्याहळोद, तामसवाडी, हेंकळवाडी, देवभाने, सोनगीर, सरवड, बुरझडसह परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या सुरुवातील मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली. आता सर्वत्र कांद्याचे पीक तयार झाल्याने काढणी सुरू आहे. मात्र कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकरी अडचणीत आले.
मोठे नुकसान सोसावे लागणार
कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. चार महिने पिकाला वाढवण्यासाठी पैसे खर्च करून व अफाट मेहनत करून एक पैसादे खील हाती येणार नाही. आता शेतात पीक घ्यावे तरी कोणते असा प्रश्न पडला आहे.- किशोर एंडाईत, शेतकरी
केलेला खर्चही निघणे मुश्कील
कापडणे परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हिवाळी कांदे लागवड केले. सद्य:स्थितीत एकरी तीस ते पस्तीस क्विंटल माल निघत आहे. मात्र सध्या बाजारात कांद्याला चारशे ते पाचशे रुपये क्विंटल दर मिळतोय मात्र कांदे लावणीपासून ते उत्पन्न निघेपर्यंत शेतकऱ्यांना क्विंटल मागे साडे चारशे ते पाचशे रुपये खर्च आला आहे. म्हणून कष्ट करूनही यश मिळत नसल्याची खंत शेतकरी कैलास नारायण माळी यांनी दिली आहे.
कृउबासत दाेन हजार क्विंटलपर्यंत आवक
शेतकऱ्यांनी कांदे काढणी सुरू केली आहे. कांद्याचे दर कधी वाढतील याची श्वाश्वती नाही. धुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांकडे कांदे साठवण करण्याची सुविधा नाही. म्हणून शेतातून कांदे काढणी झाल्यावर शेतकरी परस्पर जवळ असलेल्या बाजारात घेऊन जात आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवशी पंधराशे ते दोन हजार क्विंटल कांदे परिसरातून येत असल्याची माहिती आडत दुकानदार काशिनाथ म्हस्के यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.