आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने दरात घसरण

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यापूर्वी सततच्या पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे तेव्हा भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. पण चांगला पाऊस झाल्याने जलाशयांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. त्याचा फायदा आता भाजीपाल्याच्या शेतीला होतो आहे. काही दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी भाव खाणारा टाेमॅटाे, कोथिंबिरीच्या दरात घसरण झाली आहे.

शहरात ज्या भागातून भाजीपाला येतो त्या भागात यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे दोन भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. दीड ते दोन महिन्यापूर्वी भाज्यांची आवक कमी झाल्याने दर गगनाला भिडले हाेते. आता पाऊस थांबला असून थंडीचा तडाखा जाणवतो आहे. तसेच जलाशयांमध्ये चांगला पाणीसाठा असल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. दिवाळीच्या कालावधीत जास्त भावाने विक्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात आता िनम्म्याने घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटेच भाजीपाल्याचे लिलाव होतात. या ठिकाणी भाज्यांचे दर कमी राहत असल्याने अनेक जण भाजी खरेदीसाठी जातात.

आता थंडी संपेपर्यंत दीड ते दोन महिने असेल दिलासा
पावसाळ्यात भाज्यांची आवक कमी होती. आता आवक वाढली आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. किमान दीड ते दोन महिन्यापर्यंत ही स्थिती राहणार आहे. राकेश महाले,भाजीपाला विक्रेता

कुठून होतेय आवक
शहरात धुळे तालुक्यातील कापडणे, नगाव, मुकटी, कुसुंबा, धमाणे, फागणे, हेंद्रुण, माेघण, आर्वी, सौंदाणे, वडजाई, बाभूळवाडी, शिंदखेडा, पारोळा, अमळनेर तालुक्यातून भाजीपाल्याची आवक होते. या भागातून शेवगा, मटर, गवारची आवक कमी आहे. त्यामुळे तुलनात्मकरीत्या या भाज्याच्या दरातील घसरण इतर भाजीपाल्याच्या तुलनेत कमी असल्याची स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...