आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता-भगिनींचा सन्मान:बिलाडीत महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गाैरव

शहादा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बिलाडी त.सा. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत ८० महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गाैरव करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन पत्की, नृत्यविशारद मंगला सिसोदिया, कुबेर ग्रुपच्या आरोग्य अधिकारी मेघा खारकर, बॉलीवूड अकादमीचे सदस्य नीलेश राजपूत, केंद्रप्रमुख वसंत जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित महिलांनी प्रथमच वेगळ्या कार्यक्रमाच्या अनुभव घेतला. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आला. सचिन पत्की यांनी स्वखर्चाने या साड्या उपलब्ध केल्या. कन्यारत्नास जन्म देणाऱ्या मातांचा साडी व मास्क देऊन, काेराेना याेद्धा आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचा प्रमाणपत्र, पुस्तके व साड्या देऊन, वयोवृद्ध मातांचा नऊवारी साडी व मास्क तर स्वयंपाक मदतनीसांनाही साड्या देऊन यावेळी गौरवण्यात आले.

प्रत्येकाने महिलांचा सन्मान, आदर राखणे गरजेचे
कार्यक्रमाच्या माध्यमातून माता-भगिनींचा सन्मान करण्यात आला. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. महिलांचे योगदान खूप मोठे असून, ते कधीही विसरता येणार नाही. माता, महिलांचा सन्मान व आदर राखणे गरजेचे असल्याचे सचिन पत्की म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...