आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कामगारांचा गौरव; महावितरणच्या जळगाव कार्यालयात कार्यक्रम

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गुणवंत कामगारांचे गौरव करण्यात आला.

धुळे व नंदुरबार मंडलातील तंत्रज्ञ व यंत्रचालकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी समुपदेशक रागीब अहमद यांनी जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. योग शिक्षक सागर साळी यांनी योगाच्या माध्यमातून तणावमुक्त कसे रहावे याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक नरेश पाटील यांनी कामगार कल्याण योजनांची माहिती दिली. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी गुणवंत कामगारांचे कौतुक करत सकारात्मक विचारातून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेळकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के, गोरक्षनाथ सपकाळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...