आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:36 वर्षांपासून प्रबोधनासह सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; स्वच्छतेवर जागृती

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोगलाई परिसरातील रेणुकादेवी मित्र मंडळाने गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी जपली. मंडळातर्फे ३६ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत असून, विविध विषयांवर प्रबोधन केले जाते. तसेच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते.

शहरातील मोगलाई परिसरात असलेला देशमुखवाडा भाग विधायक उपक्रमांमुळे चर्चेत असतो. या ठिकाणी रेणुकादेवी मित्र मंडळतर्फे ३६ वर्षांपासून अखंडितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. कोरोना काळात मंडळाने प्रबोधन करण्यावर भर दिला. गणेशोत्सवात मंडळातर्फे रोज लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात. तसेच विजेत्यांना बक्षीस दिली जातात. तसेच महिलांसाठीही विविध उपक्रम राबवण्यात येतात. कार्यक्रमात महिला सहभागी होतात.

सामाजिक संदेश रुजवण्याचा प्रयत्न
मंडळातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन, वाचनसंस्कृती,एकात्मता, महिला सबलीकरण, साक्षरता, स्वच्छता,रक्तदान व वृक्षारोपणावर जनजागृती केली जाते. गणेशोत्सवातून सामाजिक संदेश रुजावा यासाठी प्रयत्न होत आहे. परिसरातील नागरिक एकत्र येत गणेशोत्सवात सहभागी होतात. सामाजिक उपक्रमातून लोक शिक्षण हा मंडळाचा उद्देश आहे
संदीप सूर्यवंशी,माजी नगरसेवक

बातम्या आणखी आहेत...