आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कारागृहात पर्यटन; प्रवेशद्वार नागरिकांसाठी होऊ शकते खुले

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रस्ताव वरिष्ठस्तरावर, नागरिकांचा बंदिवानांशी संपर्क येणार नाही अशी सोय, प्रवेशद्वार पोलिस मैदानासमोर

ब्रिटीश कालीन व राज्यातील पहिल्या तीन जुन्या कारागृहांमध्ये समावेश असलेल्या धुळे जिल्हा कारागृहात पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे, तसा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कारागृहाचे मुख्यप्रवेशद्वार सुमारे १२० वर्षानंतर प्रथमच सर्वसामन्य नागरीकांसाठी खुले होईल. पर्यटन व विकास कामांचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने पाठवला आहे.

इंग्रजांनी सन १८६२ मध्ये धुळे जिल्हा कारागृहाची निर्मिती केली. अष्टकोनी व बाराकोनी अशा दोन प्रकारात या ठिकाणी बराकी आहे. अष्टकोन व बाराकोनात चौफेर बराकी व मधोमध पहिल्या मजल्यावर सर्व दिशांनी खिडक्या असलेले कारागृह अधीक्षकांचे कार्यालय अशी रचना आहे. या बाधंकामाला १६० वर्ष झाली आहे. त्यानंतर सन १९०२ मध्ये बराकीचे बांधकाम झाले. त्यालाही सुमारे १२० वर्ष झाली. त्याला अजूनही नवीन बराकी म्हणूनच ओळखले जाते. स्वातंत्र्य पूर्व काळात या बराकींमध्ये अनेक महापुरूषांना ठेवले होते. त्यामुळे या बराकींना ऐतिहासिक.

इतिहासाला उजाळा
सन १९२० मध्ये बांधकाम झालेल्या गेटजवळ कोनशिला आहे. त्यामुळे कारागृहाची बांधणी याच वर्षी झाल्याचे मानले जात होते. दरम्यानच्या काळात सन १८६२ मधील बांधकामाची जीर्ण कागदपत्रे हाती आल्यानंतर कारागृहाचा इतिहासालाही उजाळा मिळाला .

कुठे असेल मुख्य द्वार
कारागृहाच्या मागील बाजूस बंदीवानांची शेती तसेच जवळ कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. येथन एक रस्ता पोलिस वसाहतमार्गे बसस्थानक तसेच बारापत्थर चौकात जातो. थोडक्यात पोलिस कवायत मैदानाच्या समोर कारागृहाचे प्रस्तावित मुख्यद्वार असेल. या रस्त्याने बंदीवानांना न्यायालयात नेणे सोपे होईल.

प्रस्ताव झाला प्राप्त
कारागृहाच्या नवीन गेट बद्दल प्रस्ताव काही दिवसापूर्वीच प्राप्त झाला आहे. त्यावर कार्यालयीन कामे सुरू आहे. या कामासाठी किती खर्च येईल हे स्पष्ट नाही. हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे. कायदेशीर सोपास्कारा नंतर काम हाती घेतले जाईल.
-एजाज शहा, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

बातम्या आणखी आहेत...