आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव सोहळा:तलावडी शाळेत पारितोषिक वितरण

तळोदा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तलावडी येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित अनुदानित आश्रम शाळेत सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा गुणगौरव सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्पाधिकारी नंदकुमार साबळे व शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. अखडमल उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सिल्व्हर झोन, दिल्ली यांच्यामार्फत आयोजित या परीक्षेत एकूण २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वितरण व सर्व विद्यार्थ्यांना फळ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी साबळे यांनी, संस्थेने आयोजित केलेल्या या परीक्षा विद्यार्थ्यांना भविष्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन केले. त्यांनी पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या विज्ञान मंडळाचे विशेष कौतुक केले. अखडमल यांनी, विद्यार्थ्यांनी सध्या सुरू असलेल्या या विभिन्न उपक्रमातून आपल्या भविष्याची पायाभरणी करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माध्यमिक विभागाने परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...