आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद:दोंडाईचा येथे मिरवणूक, पुस्तके मिळाल्याने आनंद

दोंडाईचा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे राऊळ दौलतसिंहजी मल्टिपर्पज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दोंडाईचा या शाळेत पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तक व वह्या पालकांच्या हस्ते वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

मुलींना अलाऊसिंग गाडीवर बसवून मिरवणूक काढली. वैशिष्ट्य म्हणजे आर्टिफिशियल नंदीबैलासह मिरवणूक काढली. मुख्याध्यापक डी.एन. जाधव यांच्या संकल्पनेने कलाशिक्षक राजन मोरे व क्रीडा शिक्षक ई. एन. बडगुजर व एन. एस. पाटील यांनी आर्टिफिशियल नंदीबैल तयार केला होता. उपमुख्याध्यापिका एस. एन. पाटील, एस. के.चंदने, शिक्षक एस. एस. लोहार, आर. एस. बागुल, बी. एस. सिसोदिया, बी. पी. ठाकूर, आर. ए. पवार, यू. के. पाटील, एन. यू. सावळे, एस. आर. तावडे, एस. डी. सोनवणे, शिक्षिका आर. व्ही. गिरासे, एम. एन. राजपूत, एल. व्ही. चौधरी यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...