आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सत्कार:सैन्य दलातून २६ वर्षे सेवा करणाऱ्या जवानाची ऐंचाळे गावातून मिरवणूक

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील ऐंचाळे येथील रहिवासी उमेश शेलार व जैताणे येथील छोटू धाकू मोरे सेना दलातून निवृत्त झाले. त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच नागरी सत्कार करण्यात आला. एंचाळे येथील उमेश काशिनाथ शेलार २६ वर्षे सैन्यात होते. त्यांनी जम्मू काश्मिर, राजस्थान, पंजाबसह अनेक संवेदनशील भागात सेवा बजावली. ते १९९९ मध्ये झालेल्या भारत-पाक कारगील युद्धात टायगर हिल भागात कार्यरत होते.

तसेच छोटू मोरे यांनी जम्मू काश्मिर, पंजाब, राजस्थानसह युएन मिशनतंर्गत साऊथ सुदानमध्ये सेवा केली. ते २० वर्षानंतर निवृत्त झाले. दोघांचा शिवराज युवा मंच, मल्हार सेनायुवा मित्र मंडळ, एकलव्य संघटना आदी सामाजिक संघटनेसह शेलार परिवारासह ठेलारी बांधव पिसाळ आणि गोयकर वाडातर्फे मानाची घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आप्पा बागले, संजय साबळे, समाधान ढिवरे, भय्या बोरसे, राजू साबळे, डॉ. नाना शेलार, शांताराम शेलार, रघुनाथ साबळे, नामदेव बाविस्कर, नाना जाधव, एकनाथ शेलार, श्रावण साबळे, साहेबराव साबळे, दादाभाई शेलार, दादाभाई साबळे, गुलाब कंखर, धनराज तेले, प्रा. बागुल, मुरलीधर तेले, दिलीप बच्छाव, प्रकाश शेलार, काशिनाथ मराठे, जीभाऊ शेलार, भटू भोई, अशोक न्हाळदे, ज्ञानेश्वर शेलार, तुकाराम साबळे, लखमीचंद शेलार, बाबुराव आहिरे, राजू पाटील, गोटू पिसाळ, विठू गोयकर, आदी उपस्थित होते. विश्वनाथ साबळे यांनी सूत्रसंचालन केले. वेडू जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...