आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील अनिल सुरेश पाटील यांनी २१ वर्षे केंद्रीय राज्य राखीव पोलिस दलात काम केेले. सेवानिवृत्त झाल्याने ते नुकतेच घरी आले. त्यानिमित्त गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सेवानिवृत्त जवान अनिल पाटील यांचा सन्मान केला. मिरवणुकीत ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व महिला सहभागी झाल्या होत्या. अनिल पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले.
येथील अनिल सुरेश पाटील हे २००१ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असूनही अनिल पाटील यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारले. तसेच कुटुंबापासून दूर राहत अनेक संकटांचा सामना करून २१ वर्षे देशसेवा केली. एकुलता एक मुलगा घरी परतल्याने आई वत्सलाबाई पाटील व वडील सुरेश पाटील, बहीण प्रतिभा अनिल पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
अनिल पाटील यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, वीर एकलव्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जाेतिराव फुले यांच्या स्मारकाला अनिल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी माजी कृषी सभापती बापू खलाणे, अरविंद जाधव, नगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, सरपंच सोनीबाई भील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, नीलेश जैन, महेश पाटील, हरीश पाटील, अमोल पाटील, जितू भील, आक्काबाई भील, प्रमोद पाटील, भैय्या माळी, माजी पंचायत समिती सदस्य शरद माळी, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, माजी सैनिक बापू माळी, यशवंत पाटील आदी उपस्थित होते. तलाठी मनोहर पाटील, शारदा पाटील, विठोबा माळी, सुरेश पंडित पाटील, वाघाडी येथील पंचायत समिती सदस्य किशोर माळी आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्य कौतुकास्पद : भामरे
या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असताना वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यासाठी व शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.