आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:वैजालीत वेळेवर ऊसतोड झाल्याने ऊस भरलेल्या वाहनांची मिरवणूक

शहादा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वैजाली येथील व परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस या वर्षीच्या हंगामात दसवड, ता.तळोदा येथील केदारेश्वर खांडसरीने वेळेवर तोडून नेल्याने शेवटचे उसाने भरलेले ट्रॅक्टर वाजत गाजत आनंद उत्सव साजरा करत शेतकऱ्यांनी खांडसरीत पाठवले.

तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील सातपुडा साखर कारखाना व समशेरपूर, ता.नंदुरबार येथील कारखाना हे दोन कारखाने असताना दसवड, ता.तळोदा येथील केदारेश्वर खांडसरीने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पूर्णपणे वेळेवर तोडून नेला. विशेष म्हणजे खांडसरीने वेळेवर मजूर वेळेवर वाहने उपलब्ध केली होती शिवाय शेतकऱ्यांना उसाचे पेमेंटही लगेच देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते.

जवळपास आठ ते दहा ट्रॉली शेवटच्या उसाने भरलेल्या शेतकऱ्यांनी हंगाम संपल्याने गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून गुलालाची उधळण केली. मिरवणुकीत शेतकरी सहभागी झाले होते. उसाने भरलेल्या ट्रेलर सजवण्यात आला होता. वैजाली गावात शेतकऱ्यांनी पहिल्यांदा असा जल्लोष केला. प्रथमच हंगाम संपण्यापूर्वी शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस ताेडून नेल्याने समाधान व्यक्त झाले. परिसरातील दोन्ही साखर कारखान्यांपेक्षा २४०० रुपये टन असा चांगला भाव दिल्याने शेतकरी आनंदीत झाले असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी दिली. मिरवणुकीत सरपंच विनोद पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील, पावभा पाटील, किशोर मोरे, सचिन पवार, किरण पाटील, सोनू पाटील आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...