आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री गुरू गोविंद महाराज यांच्या समाधीला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी महोत्सवानिमित्त संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. त्यानिमित्त रविवारी झालेल्या महोत्सवाला राज्यासह परराज्यातून हजारो भाविक आले होते. आनंदवन संस्थानचे अधिपती डॉ.मुकुंदराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांपासून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार रविवारी सकाळी रुद्राभिषेक व दुपारी दोन वाजता सद्गुरू गुरू गोविंद महाराजांचा पालखी सोहळा झाला. गावातून मिरवणूक निघाली. पालखीची आरती केली. महोत्सवानिमित्त चारही वेदांचे पारायण झाले.
येथील सिद्ध परमहंस श्री गुरू गोविंद महाराज यांच्या समाधीला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी महोत्सवानिमित्त संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहे. त्यात आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिर झाले. रक्तदान शिबिरात १३८ दात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर रविवारी सकाळी रुद्राभिषेक व दुपारी २ वाजता मठाधिपती डॉ मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते सद्गुरू गुरू गोविंद महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. आनंदवन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज व लेझीम नृत्य सादर केले. ही मिरवणूक संत सावता चौक, कासार गल्ली, शिवशक्ती चौक, शनी मंदिर, माळी मंगल कार्यालय, बाजारपेठ, गांधी चौक, बागुल गल्ली, हस्ती बँक मार्गे धनगर गल्ली, बजरंग चौक, संतोषी माता चौक, पाटील गल्ली, गुजर गल्ली, परदेशी गल्ली, ग्रामपंचायत चौक, समाधी रोडने गुरू गोविंद महाराज यांच्या मंदिराच्या प्रांगणात आली. पालखी मार्गावर संत सावता चौकात सावता ग्रुपतर्फे उसाचा रस व सरबत, कासार गल्लीत युवा सांस्कृतिक गणेश मंडळाने पोहे, मठ्ठा वाटप केले.
चारही वेदांचे पारायण... महोत्सवानिमित्त १२ ते १८ जून दरम्यान रोज चारही वेदांचे संयुक्त पारायण, श्रीमद् भागवत संहिता पारायण, श्री तुलसी रामायण पारायण, श्रीदेवी भागवत संहिता पारायण, श्री सद्गुरू केशव दत्त महाराज चरित्राचे पारायण झाले. महोत्सवात रोज दुपारी तीन ते सात दरम्यान श्रीमद् भागवतावर डॉ. मुकुंदराज महाराज यांचे निरूपण झाले.
दहा दिवस कार्यक्रम...गायिका देवकी पंडित यांचे गायन, अभिनेता शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे कार्य या विषयावर, मिलिंद क्षीरसागर यांचे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे किल्ले याविषयावर व्याख्यान, गुरुकुल संगीत अकादमीच्या मेघना भावे देसाई यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम, जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन, महेश काळे यांचे गीतगायन कार्यक्रम झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.